नवी दिल्ली : केंद्र सरकारने १० नोव्हेंबर रोजी इथेनॉलच्या दराची घोषणा केली आहे. या निर्णयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. आणि या पारंपरिक पेट्रोलियम उत्पादनांसोबत इथेनॉलच्या उच्च मिश्रणातही मदत होणार आहे.
याबाबत सूचना आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सांगितले की, वाढीनंतर उसावर आधारीत इथेनॉलचा दर ६२.६५ रुपयांवरुन ६३.४५ रुपये प्रती लिटर करण्यात आली आहे.
सी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलचा सध्याचा दर ४५.६९ रुपये प्रती लिटरवरुन वाढवून ४६.६६ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे. आणि बी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉलचा दर ५७.६१ रुपये प्रती लिटरवरुन वाढवून ५९.०८ रुपये प्रती लिटर करण्यात आला आहे.
ठाकूर यांनी सांगितले की, डिसेंबर २०२० ते नोव्हेंबर २०२१ या हंगामात पेट्रोलसोबत इथेनॉलचे मिश्रण ८ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पुढील वर्षी ते दहा टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. भारताने २०२५ पर्यंत हे मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.