कोल्हापूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या जैवइंधन धोरणामुळे राज्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे. केंद्र शासनाने इथेनॉलच्या दरामध्ये प्रतिलीटर ५ रुपयांप्रमाणे वाढ करावी, अशी मागणी ‘कुंभी-कासारी’चे अध्यक्ष, माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. यावेळी उपाध्यक्ष विश्वास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या ६१ व्या गळीत हंगामाचा काटा पूजन व गव्हाणीत मोळी टाकून प्रारंभ करताना ते बोलत होते.
यावेळी संचालक अनिल पाटील, भगवंत पाटील, अॅड. बाजीराव शेलार, राहुल खाडे, उत्तम वरुटे, दादासो लाड, किशोर पाटील, सर्जेराव हुजरे, संजय पाटील, सरदार पाटील, अनिष पाटील, प्रकाश पाटील, बळवंत पाटील, प्रकाश पाटील, वसंत आळवेकर, राऊ पाटील, कृष्णत कांबळे, विलास पाटील, युवराज शिंदे, तानाजी पाटील, रवींद्र मडके, सुरेश काटकर, धनश्री पाटील, प्रतिमा पाटील, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सेक्रेटरी प्रशांत पाटील, कामगार प्रतिनिधी दीपक चौगले, नामदेव पाटील, लेबर ऑफिसर दयानंद देसाई, सिव्हिल इंजिनिअर सरदार पाटील, डे. चीफ केमिस्ट प्रशांत नानिवडेकर, सुभाष डवंग, बी. एम. पाटील, कपिल दिवसे, नवनाथ शिरगावकर, विलास खाडे आदी उपस्थित होते.