कोल्हापूर, दि. 31 जुलै 2018 : ब्राझील देशाच्या साखर उद्योगात प्रचलीत असणाऱ्या उसापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्याचा ऐतिहासिक निण्य केंद्र सरकारने घेतला आहे. याबबात उस नियंत्रण अधिनियम 1966 मध्ये अध्यादेशाद्वारे दुरूस्ती करुन अमलात आणला आहे. महासंघाने केलेल्या आग्रही मागणीमुळे इथेनॉल खरेदी दरात 3 ते 7 रुपयांची वाढ केली आहे. 1 डिसेंबर 2018 पासून वाढीव दराने इथेनॉल खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे प्रतिलिटर इथेनॉल 40.85 रुपयांवरून 43.70 रुपये होणार आहे.
देशातील सर्व तेल कंपन्या इथेनॉल खरेदी करतील. दरम्यान 2016-17 मध्ये पुरवठा झालेल्या 67 कोटी लिटर इथेनॉलमुळे देशाचे 1750 कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले आहे. त्यासोबत 13.23 कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. यावषी÷या इथेनॉल पुरवठ्यात दुपटीने म्हणजेच 158 कोटी लिटर्स वाढ होणार आहे. इथेनॉलची आवश्यकता लक्षात घेऊन वाढीव निर्मिती प्रोत्साहन योजना कार्यान्वित झाली आहे. यासाठी 4 हजार 440 कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी पहिल्या पाच वर्षासाठी व्याज नसणार आहे. पाच वर्षानंतर बॅंक व्याजाच्या अर्धे म्हणजेच 6 टक्के पर्यंत व्याजाचा बोजा केंद्र सरकार उचलणार आहे. “संपूर्ण इथेनॉल खरेदी’ वाढीव दराने केली जाणार आहे. यासाठी तेल कंपन्यांची हमी केंद्र सरकाने मिळवली आहे. त्यामुळे याचा फायदा साखर कारखाने आणि सभासदांना होणार असल्याचे साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक आकाश नाईकनवरे यांनी सांगितले आहे.