सांगली : केंद्र सरकार साखर निर्यातीसाठी परवानगी देत नसल्याने साखर कारखानदारांनी आपला मोर्चा इथेनॉल उत्पादनाकडे वळवला आहे. केंद्र सरकारही इथेनॉल निर्मितीला चालना देत आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती कारखान्यांसाठी फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. चिखली (ता. शिराळा, जि. सांगली) येथे विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या २०२३-२४ च्या मलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते. आ. मानसिंगराव नाईक व सुनीतादेवी नाईक यांच्याहस्ते बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले.
आ. नाईक म्हणाले, कारखान्याने गाळप क्षमता पाच हजार टनावरून सात हजार टन केली आहे. विराज नाईक म्हणाले, कारखाना कार्यक्षेत्रातील शेती ही गुंठ्यांत असल्याने तोडणी मशीनचा जास्त वापर होत नाही, तरीही सात नवीन मशीन आणल्या आहेत. कारखान्याने डिस्टलरी क्षमता प्रतिदिनी ५० हजार लिटर क्षमतेवरून एक लाख लिटर केली आहे.
यावेळी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील- सरुडकर, संचालक विराज नाईक, डॉ. शिमोनी नाईक, अमरसिंह नाईक, कार्यकारी संचालक अमोल पाटील, संचालक विश्वास कदम, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, विजयराव नलवडे, दत्तात्रय पाटील, विष्णू पाटील, दिनकरराव पाटील, संदीप तडाखे, सुहास घोडे-पाटील,, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.