इथेनॉल उत्पादनासाठी सरकार आता मक्याचे उत्पादन वाढवण्यावर भर देत आहे. पण जेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या लागवडीतून चांगला नफा मिळेल, तेव्हाच उत्पादन वाढेल. चांगल्या नफ्यासाठी आपल्याला अशा वाणांवर भर द्यावा लागेल ज्यांची उत्पादकता जास्त आहे. त्यामुळे मक्याची लागवड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याचे वाण योग्य पद्धतीने निवडणे गरजेचे आहे.
भारतीय मका संशोधन संस्थेने विकसित केलेल्या IMH २२५ आणि IMH २२८ या मक्याच्या प्रजाती अशा आहेत की, ज्या वसंत ऋतु, रब्बी आणि खरीप या तिन्ही हंगामात पिकवता येतात. IMH २२५ चे उत्पादन १०२.५ क्विंटल/हेक्टर आहे. हे पिक पक्व होण्यासाठी १५५-१६० दिवस लागतात. विशेष बाब म्हणजे ही जात स्टेम बोअरर, पिंक स्टेम बोअरर आणि फॉल आर्मीवॉर्मला माफक प्रमाणात प्रतिरोधक आहे. हे वाण पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश (पश्चिम प्रदेश), उत्तराखंड (सपाट प्रदेश) आणि दिल्लीसाठी योग्य आहे.
तर संकरीत मक्याचे IMH२२४ आणि IMH२२७ हे वाणही शेतकऱ्यांसाठी खूप चांगले आहेत. IMH २२८ या संकरित जातीचे सरासरी उत्पादन १०५.७ क्विंटल/हेक्टर आहे. हे वाण बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या उत्तर-पूर्व मैदानी प्रदेशात लागवडीसाठी हे ओळखले जाते.
त्याचप्रमाणे IMH-२२४ ही मक्याची सुधारित जात आहे. मक्याची ही संकरित जात आहे. बिहार, ओडिशा, झारखंड आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी खरीप हंगामात याची पेरणी करू शकतात. कारण IMH-२२४ ही पावसावर आधारित मक्याची जात आहे. पावसाच्या पाण्यावर त्याचे सिंचन केले जाते. त्याचे उत्पादन हेक्टरी ७० क्विंटल आहे. ते ९० दिवसांत तयार होते. त्याच्या रोग प्रतिकारशक्तीमुळे मॅडिस लीफ ब्लाइट आणि फ्युसेरियम देठ कुजणे यांसारख्या रोगांनी प्रभावित होत नाही.
भारतीय मका संशोधन संस्थेचे (आयआयएमआर) संचालक डॉ. हनुमान सहाय जाट म्हणाले की भारतीय मका संशोधनाने सुमारे १४९ संकरित वाण विकसित केले आहेत. शेतकऱ्यांनी शेती करताना चांगल्या व नवीन वाणांची निवड करावी. जर लोकांनी उच्च उत्पादकता असलेल्या वाणांची निवड केली तर त्यांना लागवडीत अधिक नफा मिळेल. केंद्र सरकार ‘इथेनॉल उद्योगांसाठी पाणलोट क्षेत्रात मका उत्पादनात वाढ’ नावाचा प्रकल्प राबवत आहे. यामध्ये एफपीओ, शेतकरी, डिस्टलरी आणि बियाणे उद्योग यांना एकत्र घेऊन काम केले जात आहे.