लखनौ : बलरामपूर चीनी मिल्सचे सीएफओ प्रमोद पटवारी यांनी सांगितले की, या वर्षी भारताची साखर निर्यात आतापर्यंतच्या उच्चांकी स्थितीवर असेल. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये इथेनॉल उत्पादन क्षमता वाढविल्याचा फायदा सर्वांना मिळेल असे ते म्हणाले. याबाबात CNBC-TV18ने वृत्त प्रसिद्ध केले आहे.
पटवारी यांनी सांगितले की, बलरामपूर शुगर मिलच्या विस्ताराबरोबर इथेनॉलपासून मिळणाऱ्या महसुलातील एक तृतीयांश हिस्सा मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२२ पासून इथेनॉल विस्तार सुरू होईल. कंपनी आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ५६००-६००० कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा करीत आहे. साखरेचे दर स्थिर राहतील अशी अपेक्षा असल्याचे पटवारी यांनी सांगितले.