कोलकाता: पश्चिम बंगाल सरकारने राज्यात इथेनॉल उत्पादनाला आणखी प्रोत्साहन देण्यासाठी इथेनॉल धोरणाची घोषणा केली आहे. राज्य सरकार उद्योगांना शेतकऱ्यांकडून खराब, तुकडे पडलेले तांदुळ खरेदी करण्यास आणि इथेनॉल उत्पादन करण्यास प्रोत्साहन देईल. त्यातून स्वच्छ जैव इंधन निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, या उद्योगात पुढील एका वर्षात १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक होऊ शकते. त्यातून साधारणतः ४८,००० लोकांना रोजगाराची संधी निर्माण होईल. ग्रामीण भागात ही युनिट्स सुरू केली जाण्याची शक्यता आहे. तेल कंपन्या सध्या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे मिश्रण करीत आहेत. केंद्र सरकारने हे इथेनॉलचे मिश्रण २०२५ पर्यंत २० टक्के करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link