नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले की, अतिशय वाईट असे मागचे साल मागे सोडून, सध्याच्या आर्थिक स्थितीत उत्साहाचे वातावरण आहे.
एकीकडे जिथे शेतकरी यूनियन ने कृषी विधेयक कायद्यांविरोधात आपले आंदोलन तिव्र केले आहे, तर दुसरीकडे मोदींनी कृषी कायद्याचा बचाव करुन सांगितले की, हे कायदे शेतकऱ्यांचे उत्पन वाढवायला मदत करतील. राजधानी दिल्ली मध्ये उद्योग निकाय फिक्की च्या वार्षिक सम्मेलनात बोलताना मोदी यांनी ऑटो इंधनामध्ये 10 % इथेनॉल समिश्रणावर सरकारच्या फोकस चे उदाहरण दिले आणि सांगितले की, यामुळे ऊस शेतकऱ्यांना कारखानदारांकडून थकबाकी मिळण्यात मदत मिळाली. पहिल्यांदा ऊसापासून साखर किंवा गुळ करण्याचा पर्याय होता, पण इथेनॉल उत्पादनाला देण्यात आलेल्या प्राथमिकतेबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढेल आणि रोजगाराच्या संधीही मिळतील.
मोदी म्हणाले, शेतकऱ्यांकडे आता बाजाराच्या बाहेर, खाजगी क्षेत्र आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर विकण्याचा पर्याय आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न तितकेच वाढेल जितकी या क्षेत्रात त्यांची गुंतवणुक असेल. ग्रामीण, अर्ध-ग्रामीण क्षेत्रांबरोबर टियर -2 आणि टियर -3 शहरांमध्ये सकारात्मक बदलासाठी एक मजबूत प्लॅटफॉर्म बनवून, त्यांनी वरिष्ठ व्यवसाय आणि उद्योगातील दिग्गजांना अशा क्षेत्रांमध्ये संधीचा फायदा करून घेण्यासाठी आमंत्रित केले.