मेरठ : मवाना साखर कारखान्यामध्ये इथेनॉल प्लांट तयार झाला आहे. एक लाख २० हजार लिटर क्षमतेच्या या प्लांटला दीर्घ काळानंतर मंजुरी मिळाली. आता लवकरच इथेनॉल उत्पादन सुरू होईल. इथेनॉल तयार झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने ऊस बिले देण्यास कारखान्याला मदत होणार आहे.
जिल्हा ऊस अधिकारी आणि साखर कारखान्याच्या प्रशासकांनी सांगितले की, साखर कारखान्याचा प्लांट सुरू करण्यासाठी दीर्घ काळापासून प्रयत्न सुरू होते. दोन वर्षापूर्वी कारखान्यात प्लांट सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर याची निर्मिती सुरू होती. या प्लांटमध्ये एक लाख २० हजार लिटर इथेनॉल तयार केले जाईल. त्यातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्यासह युवकांना रोजगार मिळेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखर कारखाना प्रशासनाला ऊस बिले देण्यात अडचण येत होती. त्यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण होत होता. आता मवाना साखर कारखान्यात प्लांटला मंजुरी मिळाल्यानंतर प्लांटमधून इथेनॉल निर्मिती झाल्यानंतर प्रशासनालाही फायदा होईल. यासोबतच शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळतील. आणि युवकांनाही रोजगार मिळणार आहे.