पणजी : संजीवनी साखर कारखान्यातील प्रस्तावित ८० कोटी रुपयांच्या एकीकृत साखर कारखाना आणि इथेनॉल डिस्टिलरीमधून २३५ जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळतील असे द टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे. या योजनेमध्ये बियाणे विकास आणि शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या स्थापनेचाही समावेश आहे. इथेनॉल योजनेपासून २३५ नोकऱ्यांची निर्मिती होईल. संजीवनी साखर कारखान्यासाठी साखर कारखाना आणि डिस्टलरी प्लांटसाठी व्यक्तीगत रुपात संस्था संरचना करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत संजीवनी साखर कारखान्याकडे १८३ कामगार आहेत. राज्य सरकार ४५ किलो लीटर प्रती दिन (केएलपीडी) पेक्षा अधिक उत्पादन क्षमतेचे इको फ्रेंडली आणि झिरो लिक्विड डिस्चार्ज इथेनॉल उत्पादन प्लांट आणि प्रती दिन ७०० टनापेक्षा अधिक ऊस गाळप क्षमतेच्या प्लांटची स्थापना कारखान्यात करणार आहे.
प्रस्तावित एकात्मिक प्रकल्पात ऊस पिकाचा वापर इथेनॉलसारख्या पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी केला जाईल, असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे.