देशभरात विविध ठिकाणी इथेनॉल साठवण क्षमतेमध्ये सातत्याने वाढ

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री श्री रामेश्वर तेली यांनी सांगितले की, इथेनॉलची मिश्रणाच्या गरजांनुसार रिफायनरी, टर्मिनल आणि पुरवठादारांच्या परिसरासह अनेक ठिकाणी साठवणूक करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, सद्यस्थितीत सध्याच्या गरजांनुसार पुरेशी साठवण व्यवस्था उपलब्ध आहे.

त्यांनी सांगितले की, ओएमसीजनी इथेनॉल पुरवठा वर्ष (ईएसवाय) २०२१-२२ या कालावधीत पेट्रोलमध्ये सरासरी १० टक्के इथेनॉल मिश्रण करण्यात आले आहे. आणि या मिश्रणाला प्रोत्साहन देवून २० टक्के करण्यासाठी आवश्यकता पूर्ण करण्यासाठी देशातील विविध ठिकाणी इथेनॉल साठवण क्षमता सातत्याने वाढविण्यात येत आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस राज्यमंत्री श्री. रामेश्वर तेली यांनी आज राज्यतभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. (Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here