पाथर्डी तालुक्यात इथेनॉलचा टँकर पलटी

अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी रस्त्यावरील केळवंडी शिवारात इथेनॉल टँकर पलटी होऊन त्याला भीषण आग लागली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यावेळी अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. स्थानिक लोकांनी टँकरमधून पाच जणांना बाहेर काढले. मात्र, सहचालक गणेश पालवे आणि सुरैय्या बशीर शेख हे टँकरमध्ये अडकून आगीत होरपळून मृत्यूमुखी पडले. या अपघातात चौघे गंभीर जखमी झाले. गुरुवारी दुपारी हा अपघात झाला.

लहू सांडू पवार (वय 53), सुमन लहू पवार (वय 49), जगदीश जगन पवार (वय 3) कोमल जगन पवार (वय 7, विसरवाडी जिल्हा पैठण) हे जखमी झाले आहेत. मुख्य चालक दादासाहेब केकाण हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here