पूर्णिया : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुर्णियामधील इथेनॉल कारखान्याचे उद्घाटन केले. यावेळी उद्योग मंत्री शाहनवाज हुसेन, लेसी सिंह, खासदार संतोष कुशवाहा उपस्थित होते. हा देशातील पहिला कारखाना आहे की ज्यामध्ये हरित इथेनॉल उत्पादन होईल. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी कारखान्याची पाहणी केली. यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यांदरम्यान मुख्यमंत्री म्हणाले की, इथेनॉल फॅक्टरी सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. लवकरात लवकर आणखी प्लांट सुरू केले जातील.
नवभारत टाइम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पहिल्यांदाच येथे इथेनॉल उत्पादन होत असल्याचा आनंद होत आहे. २००७ पासून आम्ही यासाठी प्रयत्न करीत होतो. मात्र, तेव्हा सरकारने मंजुरी दिली नाही. आता २०२० मध्ये सरकारने यास मंदुरी दिली. पूर्णियामधील या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळेल. मोठ्या प्रमाणात इथेनॉल उत्पादन होऊन त्याचा पेट्रोलमध्ये वापर होईल. उद्योगमंत्री शाहनवाज हुसेन यांनी सांगितले की, मक्का आणि तांदुळापासून चालणारा हा देशातील पहिला इथेनॉल काखाना आहे. बिहार उद्योग क्षेत्रात सातत्याने पुढे जात आहे. आणखी अशा कारखान्यांचे निर्मिती केली जाईल. कारखान्याचे मालक, माजी आयएएस अधिकारी अमिताभ वर्मा यांनी सांगितले की, कारखान्यात प्रती दिन ६५,००० लिटर इथेनॉल उत्पादन होईल. त्यासाठी प्रती दिन १६० टन मक्का, १४५ टन तांदूळ खरेदी केली जाईल.