शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन होणाऱ्या तीन इथेनॉल प्लांटसाठी शेजारील पंजाब आणि हरियाणा या राज्यांतून ऊस आणि मक्क्याच्या अवशेषांचा वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारने राज्यात तीन प्लांट सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या प्लांटमधून ६०० किलोलीटर इथेनॉल उत्पादनाचा प्रस्ताव आहे. त्यासाठी राज्यातील तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे.
इथेनॉलचे दोन प्लांट सोलन जिल्ह्यातील नालागड आणि एक कांगडा जिल्ह्यातील संसारपूर टेरेसमध्ये सुरू केला जाईल. उत्पादीत इथेनॉल खरेदीसाठी संबंधीत कंपन्यांमध्ये दहा वर्षांचा करार केला जाणार आहे. त्याचा उपयोग कार्बन मोनोक्साईड उत्सर्जनात ३० ते ३५ टक्क्यांची घट, हायड्रोकार्बनमध्ये २० टक्क्यांची घट अपेक्षित आहे. धर्मशाळा येथे आयोजित रायझिंग हिमाचल गुंतवणूकदार परिषदेत इथेनॉल प्लांटसाठी प्रस्ताव आले होते. इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण केले जाईल. त्यातून पैशाची बचत होईल. तसेच राज्याच्या उत्पन्नात भर पडेल असे अतिरिक्त मुख्य सचिव आर. डी. धीमान यांनी सांगितले.
दरम्यान, इथेनॉल उत्पादनासाठी तीन्ही प्लांटना कच्च्या मालाची गरज भासेल. ही गरज शेजारील राज्यांकडून भागवली जाईल. राज्यात अपेक्षीत ऊस आणि मक्क्याचे उत्पादन घेतले जात नाही. त्यामुळे उद्योगांची गरज भागविण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यामुळे पंजाब आणि हरियाणात उसाचा रस काढल्यानंतरच्या अवशेषांचा वापर यासाठी केला जाईल. राज्यातील ऊना, हमीरपूर, बिलासपूर, सोलन आणि मंडी जिल्ह्यात अधिक ऊस आणि मक्क्याची शेती केली जाते. इतर जिल्ह्यात याचे प्रमाण कमी आहे. मक्क्याला चांगला दर मिळत नसल्याने या शेतीवर किरकोळ भर दिला जातो.
सोलन जिल्ह्यातील नालागड येथे जय ज्वाला बायो फ्यूल आणि हायजेना लाइफ सायन्सेस कंपनी तसेच कांगडा जिल्ह्यातील संसारपूर टेरेसमध्ये प्रीमियर अल्कोवेब कंपनी इथेनॉलचे उत्पादन करणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link