इथियोपियाच्या राजधानीत साखर तुटवड्याने गंभीर समस्या

अदीस अबाबा : इथियोपियाची राजधानी अदीस अबाबाला साखरेच्या अपुऱ्या संकटाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अदिस अबाबा ट्रेड ब्युरोचे उपप्रमुख मेसफिन अससेफा यांनी सांगितले की, शहरासाठी मंजूर झालेला साखरेचा कोटा १,२०,००० क्विंटल होता. मात्र, गेल्या चार महिन्यांत शहराला पुरवठा केलेल्या साखरेचा कोटा निम्म्यापेक्षा कमी आहे. व्यापार आणि विभागीय एकीकरण मंत्रालयाचे जनसंपर्क आणि संचार कार्यकारी अधिकारी Kumneger Ewnetu यांनी शहराला साखरेचा पुरवठा कमी होत असल्याच्या प्रकारास दुजोरा दिला आहे.

Kumneger ने सांगितले की, पुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी मंत्रालय भविष्यात साखर आयातदारांशी चर्चा करण्याची तयारी करत आहे. त्यांनी असेही सांगितले की, २४ डिसेंबर २०२२ आणि ८ जानेवारी २०२३ यादरम्यान महामंडळाच्या माध्यमातून २,००,००० टन साखर इथिओपियाला पोहोचण्याची शक्यता आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात इथिओपियामध्ये सर्वात मोठ्या साखर कारखान्यांपैकी एक असलेल्या फिंचा साखर कारखान्याला एका आठवड्यासाठी उत्पादन थांबवावे लागले होते. कारण ट्रक चालकांनी सुरक्षेच्या कारणावरून ऊसाची वाहतूक करण्यास नकार दिला होता. या कारखान्यामध्ये २.७ मिलियन क्विंटल साखर आणि २० मिलियन लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here