इथियोपियाच्या उद्योग समूहाचे साखर उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळवण्याचे प्रयत्न

अदिस अबाबा : इथियोपियातील साखर उद्योग समुहाने साखरेचे उत्पादन सध्याच्या ३.६ मिलियन क्विंटलच्या स्तरावरून वाढवून १३ मिलियन क्विंटल करून पुढील पाच वर्षांमध्ये देशांतर्गत उत्पादनासह देशातील साखरेची मागणी पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. इथियोपियामध्ये वार्षिक स्तरावर ३ ते ४ मिलियन क्विंटल साखरेचे उत्पादन केले जाते. मात्र, तेथील साखरेचा वार्षिक खप ५ ते ६ मिलियन क्विंटल यांदरम्यान आहे.

देशाने साखर उद्योगातील आव्हानांना तोंड देणे आणि उत्पादकता वाढविण्यासाठी पाच वर्षांसाठीची धोरणात्मक योजना लागू केली आहे. ही योजना लागू करून साखर आयात बंद करणे हे समूहाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. त्यानुसार, देशांतर्गत मागणी पूर्ण करणे आणि २०२५ पर्यंत साखर आयात बंद करण्यासाठी सिंचनाच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

इथियोपियातील साखर उद्योग समुहाचे जनसंपर्क आणि भागिदारी प्रमुख रेटा डेमेके यांच्या म्हणण्यानुसार, साखरेची मागणी गेल्या काही काळापासून देशांतर्गत पुरवठ्यापेक्षा अधिक आहे. साखर उत्पादनामध्ये आत्मनिर्भरता मिळविण्याच्या उद्दिष्टासोबतच मार्च २०२२ मध्ये समुहाची पुन्हा एकदा स्थापना करण्यात आली आहे. डेमेके यांनी समुहाची पुर्नस्थापना झाल्यानंतर ऊस उत्पादन आणि वाढता उत्पादन खर्च यावर परिणाम करणाऱ्या अडथळ्यांची ओळख पटवली आहे. ते अडथळे दूर करण्यावर लक्ष देण्यात आले आहे. यासोबतच उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन विकासाच्या पायाभूत सुविधांच्या विस्तारावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here