बागपत: कोरोनाच्या काळातही शेतकरी गहू आणि ऊस उत्पादनात अग्रेसर राहिले. जिल्ह्यातील गव्हाची बंपर खरेदी सध्या होत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशानंतर शेतकरी साखर कारखान्यांत आपला ऊस पोहोचवत आहेत. त्यामुळे साखरेचे बंपर उत्पादन सुरू आहे. त्यामुळे साखर उत्पादन वाढीसह शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान थांबले. त्यामुळे शेतकरी खुश आहेत.
बागपत जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी २ कोटी ९३ लाख क्विंटल उसाचे गाळप करुन ३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. शेतकऱ्यांना एकूण ८ हजार ८८३ कोटी रुपये ऊस बिल मिळणार आहे. त्यापैकी थोडे पैसे मिळाले असून अद्याप ६ हजार ६५६ कोटी रुपये थकबाकी लवकरच मिळणार आहे.
बागपतमध्ये बागपत आणि रमाला शुगर मिल हे दोन सहकारी साखर कारखाने असून एसीबीसी शुगर मलकपूर हा खासगी कारखाना आहे. लॉकडाउन असूनही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशआनंतर साखर कारखाने सुरू ठेवण्यात आले. बागपतच्या जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी कोरोना गाइडलाइन्सचे पालन करीत उसाचे गाळप केले. रमाला साखर काखान्याने ९८ लाख क्विंटल उसाचे गाळप करून हंगाम संपुष्टात आणला. हे गाळप उच्चांकी आहे. जिल्ह्यात २ कोटी ९३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले असून ३२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस संपत नाही, तोपर्यंत गाळप सुरू राहील असे जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांना उर्वरीत ऊस बिले लवकरच मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.