लखनौ : चीनी मंडी
अतिरिक्त साखरेचा मुद्दा केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या बाजारपेठेत चिंतेचा विषय बनला आहे. येत्याकाळात उसासारख्या नगदी पिकापासून शेतकऱ्यांना रोखायचे कसे,अशी चिंता राज्यकर्त्यांना लागली आहे. त्याचवेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेला अजब सल्ला गेले दोन दिवस चर्चेचा विषय ठरला आहे. यावरून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांना टिकेलाही सामोरे जावे लात आहे.
बाघपत येथे रस्त्याच्या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचा विषय मांडला. ते म्हणाले, ‘उसाचे उत्पादन जास्त झाले की अर्थातच साखरेची खरेदी जास्त होते. त्यामुळे मधूमेहाचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस सोडून इतर पिकांचा विचार कारावा.’
योगा आदित्यनाथ म्हणाले, ‘उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी दिल्लीची बाजारपेठ चांगली आहे. त्यामुळे माझे शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी ऊस सोडून भाजीपाला आणि इतर पिकांकडे वळावे. याचा शेतकऱ्यांना आणि राज्य सरकारलाही फायदा होईल.’
उत्तर प्रदेशात देशाच्या एकूण ऊस उत्पादनाच्या ३८ टक्के उत्पादन होते. हंगामातील अतिरिक्त साठ्यामुळे साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची देणी थकली आहेत. यासंदर्भात जे साखर कारखाने येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांची देणी भागवण्यात अपयशी ठरतील, त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असेही योगा आदित्यनाथ यांनी या कार्यक्रमात स्पष्ट केले.
योगी आदित्यनाथ यांचे वक्तव्य योग्य की आयोग्य यावरून सोशल मीडियावर सध्या चर्चेला उधाण आले आहे. अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्या ऐवजी, राज्यकर्ते शेतकऱ्यांना नगदी पिकापासून रोखत असल्याची टिका होऊ लागली आहे. मुळात ऊस उत्पादक शेतकरी हा, उत्तर प्रदेशातील सर्वांत मोठा वर्ग आहे. राज्यातील २५ लोकसभा मतदारसंघांमध्ये या शेतकऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याचा भाजपा फटका बसणार नाही ना? असा प्रश्न उपस्थि होत आहे.