विलास साखर कारखाना युनीट – २ च्या यशात सर्वांचे योगदान : चेअरमन वैशाली देशमुख

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रासह लातूरच्या प्रगतीत मोलाची कामगिरी केली. उदगीर आणि परिसराच्या विकासाबाबत ते नेहमीच आग्रही असायचे. त्यांच्या पूढाकारातून विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २ या भागात कार्यान्वित झाला. हजारो शेतकऱ्यांसह शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला. सध्या विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २ यशस्वीपणे वाटचाल करीत असून यामध्ये शेतकरी, अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांचेच मोठे योगदान आहे, असे प्रतीपादन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी केले.

विलास सहकारी साखर कारखाना युनीट – २ ( तोडार ता. उदगीर) येथील कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदिपन चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या हस्ते आणि सर्व संचालकांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी चेअरमन वैशाली देशमुख यांनी गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन केले. माजी वैद्यकीय, शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित देशमुख हे लातूर जिल्हयातील उदगीरसह जळकोट, चाकूर, शिरुर ताजबंद व अहमदपुर येथील ऊस गाळपासाठी आणि शेतकरी ऊस उत्पादकांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी देशमुख यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here