लातूर : तळेगाव येथील जागृती शुगर अलाईड इंडस्ट्रीजने चालू गळीत हंगामात ८८ दिवसांत ४ लाख ९ हजार मे. टनाचे ऊसाचे गाळप केले आहे. कारखान्याने चालू गळीत हंगामात ८ लाख ३६ हजार १०० क्विं. साखर उत्पादन केले आहे. ३५ लाख ३३ हजार ४५३ ली. इथेनॉल निर्मिती केली आहे. तसेच १ कोटी ३८ लाख ३७ हजार युनिट इतकी वीज वितरीत केली आहे, असे सांगण्यात आले. कारखान्याने चालू गळीत हंगामात ३१ मार्चपूर्वी उसाचे गाळप करावे अशी सूचना जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केली आहे.
देशमुख यांनी कारखान्याच्या गाळप स्थितीचा आढावा घेतला. जागृती शुगरने २० जानेवारी २०२४ अखेर शेतकऱ्यांना प्रती टन २५०० रुपये ऊस बिल शेतकऱ्यांना अदा केले आहे. यासोबत ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट ठरलेल्या कालावधीत नियमीतपणे अदा केले आहे. जागृती साखर कारखान्याला सरासरी ११.०१ टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखान्याने ३१ मार्चपूर्वी सर्व ऊसाचे गाळप जागृती कारखाना करणार आहे, असे जागृती कारखान्याच्या चेअरमन तथा कार्यकारी संचालिका गौरवीताई अतुल भोसले, उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जनरल मॅनेजर गणेश येवले यांनी यावेळी सांगितले.