जिल्ह्यात आजपासून सुरू होणार ऊसाच्या सर्व्हेचे प्रदर्शन

पीलीभीत : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या क्षेत्रातील विविध गावांमध्ये ऊस विभाग आणि साखर कारखान्यांच्यावतीने सर्व्हेच्या पाहणी अहवालाची मांडणी केली जाणार आहे. ऊस विभागाने याची तयारी सुरू केली आहे.

एलएच शुगर फॅक्टरी पिलीभीत, किसान सहकारी साखर कारखाना बीसलपूर, किसान सहकारी साखर कारखाना पूरनपूर आणि बजाज हिंदूस्थान लिमिटेड बरखेडा यांच्याकडून हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. गळीत हंगाम संपल्यावर मे महिन्यात साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्रात उसाचा सर्व्हे सुरू केला. त्यामध्ये ऊस विकास परिषद आणि साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी भाग घेतला उसाच्या सर्व्हेची आकडेवारीचा ताळमेळ पूर्ण झाला आहे. आता ३० जुलैपासून गावनिहाय माहितीची पडताळणी केली जाईल. यासाठी ऊस विभाग आणि साखर कारखान्यांचे कर्मचारी काम करतील. एससीडीआय रामभद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऊसाच्या सर्व्हेचे काम खूप आधीच पूर्ण झाले आहे. आता गाववार याची माहिती दिली जाईल. या दरम्यान शेतकरी आपल्या अडचणी दूर करू शकतील.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here