सांगली : विश्वासराव नाईक साखर कारखान्याच्या नवीन डिस्टीलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण सुरू असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक यांनी दिली. चिखली (ता. शिराळा) येथे कारखाना कार्यस्थळावर २०२३-२४ गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखान्याचा सहवीज निर्मिती प्रकल्प कर्जमुक्त झाल्याची घोषणा त्यांनी केली. यावेळी साखर पोती पूजन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या तोडणी मजूर, वाहतूक कंत्राटदार तसेच हंगामी काम करणारे कंत्राटदार यांचा सत्कार व बक्षीस योजनेची सोडत काढण्यात आली.
आ. नाईक म्हणाले की, कारखान्याने यंदा ५ लाख ६९ हजार ३६७ मे. टन ऊस गाळप केले आहे. १२.०६ टक्के साखर उताऱ्यासह एकूण ६ लाख ८६ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. एकूण ६,८६,७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. यावेळी संचालक सुरेश चव्हाण, सुमित्रा चव्हाण यांच्याहस्ते पूजा झाली. उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कार्यकारी संचालक अमोल पाटील, दिनकर पाटील, विश्वास कदम प्रमुख उपस्थित होते. डॉ. राजाराम पाटील, विष्णू पाटील, दत्तात्रय पाटील, सुहास घोडे-पाटील, बाळासाहेब पाटील, विष्णू पाटील, सुकुमार पाटील, यशवंत निकम, संदीप तडाखे, बाबासो पाटील, यशवंत दळवी, गुरुदेव आमरे, दत्तात्रय पाटील, कोंडीबा चौगुले आदी उपस्थित होते. शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. विजय थोर सूत्रसंचालन यांनी केले. विश्वास पाटील यांनी आभार मानले.