नवी दिल्ली : देशाच्या निर्यातीला कोविड १९ महामारीमुळे मोठा फटका बसला. पण आता निर्यात सुरळीत होत आहे. निर्यातीमध्ये सातत्याने सुधारणा होत आहे. आणि आणखी वाढ होण्याची अपेक्षाही आहे, अशी माहिती वाणिज्य सचिव अनुप वाधवान यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिला.
कोविड महामारीमुळे देशाची निर्यात ठप्प झाली होती. ती सप्टेंबर २०२० मध्ये सकारात्मक झाली. सप्टंबरनंतर काही महिन्यांसाठी नकारात्मक वृद्धी होर होता. मात्र, जानेवारी २०२१ पासून निर्यातीत सकारात्मक वाढ होत आहे. भारताची निर्यात लवकरच चांगल्या स्थितीत येईल असे सचिव वाधवान यांनी सांगितले.
फेब्रुवारी महिन्यात भारताची निर्यात ०.२५ टक्क्यांनी घटून २७.६ बिलियन अमेरिकन डॉलर झाली. तर आयात ६.९८ टक्क्यांनी वाढून ४०.५५ बिलियन डॉलर झाली. मार्च महिन्याचा अधिकृत डेटा जानेवारी महिन्यात उपलब्ध होील. रत्न, आभुषणे, पेट्रोलियन अशा क्षेत्रांनी आणखी भरारी घेण्याची गरज आहे. फार्मा, खाद्य उत्पादने अशी क्षेत्रांमधून फायदा सुरू ठेवण्याचे प्रयत्न हवेत असे सचिव वाधवान यांनी सांगितले.