जर्मनीतील साकर उद्योग असोसिएशन डब्ल्यूव्हीझेडने आपल्या पीक उत्पादनाचे पूर्वानुमान जाहीर केले आहे. त्यानुसार २०२१-२२ या हंगामात जर्मनीत प्रकिया केलेल्या साखरेचे उत्पादन ४.१० मिलियन टनावरुन वाढून ४.३८ मिलियन टन होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
असोसिएशनने सांगितले की, जर्मनीतील शेतकऱ्यांनी नवीन पिकासाठी जवळपास ३,५४,००० हेक्टर बिटची लागवड करण्यात आली आहे. गेल्या हंगामात बीटची लागवड ३,५०,००० हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. नव्या हंगामात, २०२१-२२ मध्ये २७.५ मिलियनटन बीट प्रक्रियेसाठी साखर कारखान्यांमध्ये येईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याआधीच्या हंगामात २५.७२ मिलियन टन बीटवर प्रक्रीया करण्यात आली होती.
चालू हंगामात बीटमधील साखरेचा सरासरी उतारा १८ टक्के राहील अशी अपेक्षा आहे. गेल्या हंगामात हा उतारा १७.९ टक्के इतका होता.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link