गव्हाच्या पेरणीसाठी यंत्राच्या वापराने कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

कुशीनगर : गव्हाच्या पेरणीसाठी खर्च कमी करून जादा उत्पादन मिळवणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी हॅपी सीडर मशीन उपयुक्त ठरत आहे. यातून धान्याचे अवशेष जाळण्यापासूनही सुटका होत आहे. पाचट आणि इतर अवशेष सडल्याने शेतातील जैविक खाद्याची तुट भरून निघत आहे. या तंत्रामुळे पेरणीसाठी शेत नांगरणी करणे गरजेचे नाही, यामुळे शेतातील ओलावा कायम राहतो आणि जास्त सिंचन करावे लागत नाही. या पद्धतीने गव्हाची पेरणी अधिक फायदेशीर असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, टर्बो हॅपी सीडर हे ट्रॅक्टरच्या मदतीने गव्हाची पेरणी करणारे मशीन आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर इंटरनॅशनल अॅग्री रिसर्चच्या सहकार्याने हे विकसित केले आहे. या यंत्राचा वापर भातशेतीच्या व्यवस्थापनासाठी केला जातो. पंजाब कृषी विद्यापीठाने २००२ मध्ये हे मशीन विकसित केले. त्याची चाचणीनंतर २००५-०६ मध्ये शेतकऱ्यांसाठी शिफारस करण्यात आली. तर ते २००६ मध्ये बाजारात आणण्यात आले. सद्यस्थितीत याची किंमत एक लाख ५० हजार रुपये ते एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकरी गटांना खासगी वापरासाठी ५० टक्के सवलतीत हे यंत्र उपलब्ध करून दिले जाते. पारंपरिक पद्धतीने गव्हाचे उत्पादन एकरी १९ ते २२ क्विंटल मिळते. हॅपी सिडरमुळे उत्पादन पहिल्या वर्षी १७ क्विंटल तर नंतर २२ क्विटंलपर्यंत वाढते असे कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक राय यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here