स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीस साखर कारखानदारांसह तज्ज्ञ अहसमत

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मागणी केलेला ३३०० रुपये प्रती टन हा ऊस दर अव्यवहार्य आहे, असा दावा पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारांनी केला आहे. कारखाने सध्या असा दर देण्याच्या स्थितीत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शेट्टी यांनी मंगळवारी ऊस परिषदेत शेतकऱ्यांच्या उसाला ३३०० रुपये एफआरपी देण्याची मागणी केली होती. यादरम्यान सध्या कारखाने २८०० ते ३१०० रुपये प्रती टन ऊस दर देत आहेत. त्यामध्ये तोडणी आणि वाहतूक शुल्क समाविष्ट नाही.

शेट्टी यांनी दावा केली आहे की, साखरेचे दर चांगले आहेत. त्यामुळे साखर कारखानदार ऊसाचा चांगला दर देऊ शकतात.

यासंदर्भात टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि आमदार अरुण लाड यांनी सांगितले की, सध्याच्या स्थितीत कारखानदारांना या मागणीनुसार पैसे देणे परवडणारे नाही. आम्ही एकरकमी एफआरपी बरोबर दर देण्यास तयार आहोत. जर शेतकरी नेत्यांचा जादा दराचा दावा असेल तर त्यासाठी स्वतंत्र ऑडिट करण्याची गरज आहे की, कारखाने एवढा दर देऊ शकतात की नाही.
उद्योगातील तज्ज्ञ विजय औताडे म्हणाले, साखर कारखानदार शेतकरी नेत्यांच्या मागणीनुसार दर देण्याच्या स्थितीत नाहीत. कर्ज, देखभाल खर्च, व्यवस्थापन खर्च, कामगारांचे वेतन, तोडणी आणि वाहतूक खर्च पाहता सध्या फक्त एफआरपीच्या बरोबरीने ऊस दर देणे शक्य होणार आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here