चंदीगढ : हरियाणा सरकारने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना नुकसानीतून वाचवण्यासाठी सहकारी साखर कारखान्यांमध्ये तज्ञांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पलवल, असंध आणि महम च्या सहकारी साखर कारखान्यांमध्ये मुख्य कार्यकारी अधिक़ार्यांची नियुक्ती करण्यात येईल. हरियाणा चे सहकार मंत्री बनवारी लाल यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यामध्ये, एचसीएस अधिक़ार्यांच्या स्थानावर पलवल, असंध आणि मेहम च्या सहकारी कारखान्यांमध्ये साखर कारखान्यांशी संबंधीत ज्ञान आणि अनुभव असणार्या सीईओंची नेमणूक केली जाईल.
राज्याच्या सहकारी साखर कारखान्यांना उभारी देण्याच्या माध्यमातून ,साखर कारखान्यांतील कामकाज अधिक चांगले कसे होईल यावरही ते सुचना देतील. त्यांनी साींगितले की, जर या रणनिति तून सकारात्मक परिणाम झाले, तर या प्रणालीला इतर सहकारी साखर कारखान्यांमध्येही लागू केले जाईल.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.