कराची : सिंध पर्यावरण संरक्षण एजन्सीने (एसईपीए) पाकिस्तानच्या सीमा शुल्कला असा सल्ला दिला की, अफगाणिस्तानात जी भारतीय साखर निर्यात केली जाते, तिला पुढे जाण्याची अनुमती देवू नये. कारण तपासणीतून असे समजले की, ही साखर खाण्यायोग्य नाही. एसईपीए च्या तांत्रिक टीमने पाकिस्तानी सीमा शुल्क कार्यालयाचा दौरा आणि भारतीय साखरेच्या तपासणीनंतरच हा सल्ला दिला. भारताकडून साखरेचे 265 कंटेनर अफगाणिस्तानात पाठवण्यात आले होते, ज्याची तपासणी कराची बंदरावर करण्यात आली.
एसईपीए च्या अधिकार्यांनी सिंध सरकार च्या पर्यावरण, जलावायू परिवर्तन आणि तटीय विकास विभागचे तांत्रिक निर्देशक आशिक लंगाह यांच्या नेतृत्वाखालील टीमने शनिवारी कराची मध्ये पाकिस्तान सीमा शुल्क कार्यालयाचा दौरा केला आणि त्यांच्या कडून संपूर्ण तपासणी केली असता, भारतीय साखर खराब असल्याचे प्रकरण समोर आले. एसईपीए टीम ला असे सूचित करण्यात आले होते की, पीसीएसआयआर आणि एचइजे रिसर्च इन्स्टिट्यूट या दोन्ही प्रयोगशाळांच्या अहवालानुसार भारतीय साखरेची एक्सपायरी डेट संपली आहे. दोन्ही प्रयोगशाळांमध्ये या साखरेच्या रंगासह चार प्रमुख मापदंडांच्या संदर्भातील काही नमून्यांचे परीक्षण करण्यात आले होते
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.