नवी दिल्ली : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात भारतात एकूण २७.६७ बिलियन डॉलरची निर्यात झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही निर्यात ०.२५ टक्क्याने कमी आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २७.७४ बिलियन डॉलरची निर्यात झाली. होती. दुसरीकडे फेब्रुवारी २०२० मध्ये आयात ३७.९ बिलियन डॉलरवरून ६.९८ टक्के वाढून ४०.५५ बिलियन डॉलर झाली होती. याच पद्धतीने फेब्रुवारी २०२०मधील १०.१६ बिलियन डॉलरच्या तुलनेत फेब्रुवारी २०२१ मध्ये व्यापार तूट वाढून १२.८८ बिलियन डॉलर झाली आहे.
एप्रिल ते फेब्रुवारीपर्यंत गेल्या वर्षी याच कालावधीत २९१.८ बिलियन डॉलरच्या तुलनेत एकूण २५५.९ बिलियन डॉलरची निर्यात झाली आहे. त्यामुळे उणे १२.३२ टक्के वृद्धीची नोंद झाली आहे. या कालावधीत करण्यात आलेल्या आयातीमध्ये ४४३.२ बिलियन डॉलरच्या तुलनेत २३ टक्के घट होऊन ३४०.८ बिलियन डॉलर झाली होती. फेब्रुवारी २०२० मध्ये गेल्या महिन्यात पेट्रोलियम पदार्थ वगळता इतर निर्यातीचे मूल्य २५.१ बिलियन डॉलर होते. तर फेब्रुवारी २०२० मध्ये १०.७ बिलियन डॉलरच्या तुलनेत तेल आयात १६.६३ टक्क्यांनी घटून ८.९ बिलियन डॉलर झाली होती.