खराब हवामानामुळे गेल्या ५० वर्षांत $४.३ ट्रिलियनचे आर्थिक नुकसान

जागतिक हवामान संघटनेने (World Meteorological Organization/WMO) सोमवारी सांगितले की, गेल्या पन्नास वर्षात २० लाखांहून अधिक मृत्यू आणि ४.३ ट्रिलियन डॉलर्सचे आर्थिक नुकसान झाले आहे. हा मानवनिर्मित ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे डब्ल्यूएमओचे म्हणणे आहे.

WMO च्या म्हणण्यानुसार, हवामान, वातावरण आणि पाणी याच्याशी संबंधीत धोक्यांमुळे १९७० आणि २०२१ या कालावधीत म्हणजेच ५० वर्षात १२,००० घटना घडल्या आहेत. हवामानातील बदल आणि अत्यंत खराब हवामानामुळे ६० टक्के आर्थिक नुकसान झाले.

WMO ने सोमवारी, स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे सुरू झालेल्या चतुष्कोणीय जागतिक हवामानशास्त्रीय काँग्रेसमध्ये नवीन निष्कर्ष प्रसिद्ध केले आहेत. डब्ल्यूएमओने म्हटले आहे की, कमी विकसित देश आणि लहान बेटांना तसेच विकसनशील राज्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या आकाराच्या तुलनेत “असमान” उच्च खर्चाचा सामना करावा लागला.

WMO चे महासचिव पेटेरी तालस यांनी सांगितले की, “दुर्दैवाने सर्वात असुरक्षित समुदाय हवामान आणि पाण्याशी संबंधित धोक्यांचा फटका सहन करतात.” त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की, किमान विकसित देशांमध्ये, गेल्या अर्ध्या शतकात अनेक आपत्तींमुळे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) ३० टक्क्यांपर्यंतचे आर्थिक नुकसान झाले आहे. लहान बेटे आणि विकसनशील राज्यांमध्ये, पाचपैकी एका आपत्तीचा खर्च GDP च्या “पाच टक्क्यांपेक्षा जास्त” होतो, काही आपत्तींमुळे देशांचा संपूर्ण GDP नष्ट होतो.

गेल्या, ५० वर्षात हवामान बदल, पाणी तसेच वातावरणातील बदलांमुळे आशियात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यामध्ये जवळपास १० लाख मृत्यू झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक मृत्यू बांगलादेशात झाले आहेत.
WMO म्हणजे रिपोर्टनुसार, आफ्रिकेत ७,३३,५८५ मृत्यू हवामान बदलामुळे झाले आहेत. यातील ९५ टक्के मृत्यू दुष्काळामुळे झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here