बातम्या वाचू नका ऐकाही, बातम्या वाचणे झाले एकदम सोपे ,आत्ता बातम्या वाचणे आणि ऐकणे झाले एकत्रच
कोल्हापूर : चीनी मंडी
एफआरपीचा पहिला हप्ता दिल्यानंतर उर्वरीत एफआरपी देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना साखर देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दाखवली आहे. येथे झालेल्या कारखानदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. साखर घेण्यासाठी येत्या सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन साखर कारखानदारांनी केले आहे.
कारखान्यांकडे एक रकमी एफआरपी देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे एफआरपी थकली. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि त्यांनी पुण्यात हल्लाबोल आंदोलन केले. त्याची दखल घेत साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारत कारखान्यांची साखर जप्त करण्याचे आदेश दिले. या कारवाईपासून वाचण्यासाठी आता साखर कारखानदारांनी उर्वरीत एफआरपीच्या बदल्यात साखर देण्याचे मान्य केले.
कोल्हापुरातील साखर कारखानदारांच्या बैठकीत साखरेसाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी सात दिवसांची मुदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. त्यात साखर हवी असल्याची मागणी करणारा अर्ज कारखान्यांच्या शेती कार्यालयात जमा करावयाचा आहे. जर, शेतकऱ्यांनी साखरेसाठी अर्ज केला नाही तर, उर्वरीत एफआरपीची रक्कम कारखाना त्यांच्याकडील उपलब्धतेनुसार जमा करेल. याचा अर्जाचा नमुना कारखान्यांनी एकत्रित तयार करून तो प्रसिद्धिस दिला आहे.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp