सातारा जिल्ह्यात कारखाने ३१०० तर संघटना ३५०० रुपयांवर ठाम

सातारा : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस दराबाबतच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी ठाम भूमिका घेतल्याने कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ३१०० रुपये दर जाहीर केला. मात्र, शेतकरी संघटनांनी पहिला हप्ता ३५०० रुपयेच देण्याचीच आक्रमक भूमिका कायम ठेवली. त्यामुळे तोडगा निघालाच नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना लवकर निर्णय घेण्याची सूचना केली आहे. संघटनांनी मात्र, एकत्र येत गनिमी काव्याने आंदोलन करत साखर अडविण्याचा इशारा दिला आहे.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखानदार आणि शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना, बळीराजा शेतकरी संघटनांचे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. रघुनाथदादा पाटील, पंजाबराव पाटील, राजू शेळके, विकास जाधव, मधुकर जाधव, देवानंद पाटील आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना उत्पन्न अन खर्चाचा ताळमेळ पाहता जादा एफआरपी मिळालीच पाहिजे अशी भूमिका संघटनांनी मांडली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके म्हणाले की, उसाला उत्पन्न अन खर्चाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आहे .कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार समाधानकारक दर देऊ शकतात. मग, जिल्ह्यातील कारखानदारांना काय होते. प्रती टन ३५०० रुपये न दिल्यास रस्त्यावर उतरू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here