लखनऊ: उत्तर प्रदेशमध्ये ऊस बिलांचा मुद्दा नेहमी एैरणीवर येतो. आताही राज्य सरकारने गेल्या हंगामातील सर्व बिले अदा केल्याचा दावा केला आहे.
ऊस मंत्री सुरेश राणा यांनी ऊस बिलांबाबत आढावा घेतला. यावेळी अप्पर मुख्य सचिव संजय आर. भूसरेड्डी यांनी सांगितले की, गेल्या गळीत हंगामात २०१९-२० मध्ये एकूण ३५,८९८.८५ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. चालू हंगामात, २०२०-२१ मध्ये सुमारे ६१ टक्के ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत. बैठकीवेळी मंत्री राणा यांनी शेतकऱ्यांना उसाचे पैसे गतीने देण्यास गती देण्याचे निर्देश दिले.
मंत्री राणा यांनी ऊस उत्पादक शेतकरी, विभागीय कर्मचारी आणि साखर कारखाना कामगारांनी कोरोनापासून बचावासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. राज्यात ऊस हंगाम समाप्तीच्या मार्गावर आहे. अद्याप ५० साखर कारखाने सुरू आहेत. कोरोना रोखण्यासाठी सर्व विभागीय आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी खबरदारी घेण्याबाबत त्यांनी आवाहन केले.