नजीबाबाद : साखर कारखाना प्रशासानाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४ दिवसांत बिले अदा करावीत अशी मागणी भारतीय किसान युनियनच्या मासिक पंचायत बैठकीत करण्यात आली.
लोनिवीच्या गेस्ट हाऊसवर आयोजित पंचायतीत भाकियूचे प्रदेश उपाध्यक्ष बलराम सिंह यांनी सांगितले की, नजीबाबाद साखर कारखान्याने गेल्या गळीत हंगामात ऊस बिले चालू गळीत हंगामाचे सत्र सुरू केल्यानंतर दिली आहेत. मात्र, चालू हंगामात एकही ऊस बिल अदा केलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. विभाग अध्यक्ष कुलवीर सिंह यांनी सांगितले की, शेती मधील इतर अडचणींमुळेही शेतकरी अडचणीत आहेत. पंचायतमध्ये शेतकऱ्यांनी विजेच्या पुरवठ्याची वेळ वाढवावी, रस्ते दुरुस्ती करावी आदी मागण्या केल्या. यावेळी विभागीय अध्यक्ष विजय सिंह, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र सिंह, मीडिया प्रभारी सुनील कुमार, दीपक तोमर, रुपेंद्र सिंह, प्रशांत चौधरी, सरदार इक्बाल सिंह आदी उपस्थित होते. दरम्यान, भाकियू भानू गटाने मंडल प्रभारी चौ. राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी एसडीएम मनोज कुमार सिंह यांना निवेदन दिले.