मुझफ्फरनगर(उत्तर प्रदेश): ऊस उत्पादकाच्या आत्महत्येमुळे कॉंग्रेस, बीकेयू आणि आरएलडी पक्षानं कडून तीव्र पडसाद उमटत आहेत उत्तर प्रदेशचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी बुधवारी कारखान्यांना त्यांचे कामकाज सुरू ठेवण्यास सांगितले.शेवटचा ऊस गाळपाला येईपर्यंत कारखाने सुरु राहिले पाहिजेत,असे ते म्हणाले व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहारनपूर रेंजचे अधिकारीम्हणाले, “ जोपर्यंत शेतात ऊस आहे तोपर्यंत कारखान्यांच्या चिमणीतून धूर चालूच राहिला पाहिजे.
एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या काही दिवसानंतर हे निवेदन करण्यात आले. साखर कारखानदारांच्या अनेक फेऱ्यानंतर 52 वर्षाच्या ओमपालला त्याचा ऊस विक्रीसाठी स्लिप मिळू शकली नाही. गेल्या आठवड्यात त्याने स्वत: ला गळफास लावून आत्महत्या केली ,त्यामुळे प्रदेशात एक राजकीय वादळ निर्माण झाले .
कॉंग्रेसच्या प्रियंका गांधी, बीकेयू आणि आरएलडी यांनी शेतकऱ्यांना लॉकडाऊनमुळे त्यांच्या पिकासाठी योग्य किंमत मिळत नसल्याचा आरोप करुन राज्य सरकारला फटकारले. दुसर्याच दिवशी मोठा निषेधही भडकला आणि केंद्रीय मंत्री संजीव बाल्यान यांनी त्या ठिकाणी जाउन शेतकऱ्यांचे सांत्वन केले.
राणा म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या देखरेखीखाली संपूर्ण राज्यात 112 करोड क्विंटल ऊसाचे कारखान्यात गाळप करण्यात आले. ९ साखर कारखाने अजूनही सुरु आहेत. ऊस थकबाकी बाबत बोलताना ते म्हणाले, पूर्वीच्या समाजवादी पक्षाच्या काळात 95,000 करोड इतकी थकबाकी गेल्या पाच वर्षात सरकारने भागवली आहे ,तर आमच्या सरकारने 99,000 करोड रुपये या तीन वर्षात दिले आहेत.
कॉंग्रेसच्या प्रियांका गांधी यांनी ट्विट केले की, उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने शेतकऱ्यांचे पैसे भागवले नाहीत. भारतीय किसान यूनियन ने आरोप केला की, लॉक डाउन मुळे शेतकऱ्यांना पिकाची योग्य किंमत दिली गेली नाही.
जिल्हा दंडाधिकारी सेल्वा कुमारी म्हणाले होते की, “ त्या शेतकर्याचा ऊस कारखान्याने विकत घेतला असता, उरलेले पीकही खरेदी केले असते. पण ओम्पालचा त्याच्या भावासोबत मालमत्तेचा वाद असल्याचे पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आले आहे. ”
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.