कारखाना शेतकऱ्यांना ऊस लागणीपासून विक्रीपर्यंत सर्वोतोपरी करणार मदत: सरव्यवस्थापक

मोतीपूर : विशुनपुरा पकडी गावातील पॅक्स भवनात सिधवलिया साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाच्यावतीने शरद ऋतुमधील ऊस लागवड अभियानांतर्गत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना उसाच्या चांगल्या उत्पादनासाठी प्रशिक्षणही देण्यात आले.

लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याचे सरव्यवस्थापक शाशी केडिया यांनी सांगितले की, मोतीपुर कारखाना साखर उत्पादनासाठी ओळखला जात होता. येथील शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतींची जाण आहे. त्यांना आता योग्य वेळी ऊसाचे प्रगत बियाणे, नवे तंत्र याची माहिती देण्याची गरज आहे. सिधवालिया कारखाना शेतकऱ्यांना ऊस लागवडीपासून ते तोडणीपर्यंत, विक्रीपर्यंत सर्व स्तरावर मदत करेल. स्थानिक स्तरावरही ऊस खरेदी केंद्रे सुरू केली जातील आणि बँक खात्यात ऊस बिले जमा केली जातील. यावेळी एजीएम आर. के. सिंह, ऊस व्यवस्थापक मनोज सिंह, सहायक व्यवस्थापक के. पी. सिंह, बी. के. सिंह, भुवनेश्वर राय, पंकज तिवारी, मुकेश ठाकुर, नवल किशोर सिंह, धर्मनाथ तिवारी, राजेंद्र सिंह, योगेंद्र सिंह, रामबाबू सिंह, रंजीत सिंह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here