नवी दिल्ली: पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. पॅन कार्डला आधार कार्डशी जोडण्याची नवी मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत आहे. सद्यस्थितीत तुम्ही १,००० रुपये दंड भरून आधार-पॅन लिंक करुन घेवू शकता. जर ३० जून या नव्या मुदतीपर्यंत तुम्ही दोन्ही कार्डांचे लिंकिंग केले नाही तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय ठरू शकते. त्यानंतर लिंकिंगसाठी तुम्हाला १०,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागेल. आयकर अधिनियम कलम २७२ बी अन्वये १०,००० रुपये दंडाची तरतूद आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमधील वृत्तानुसार, आयकर अधिनियम कलम १३९ एए अनुसार ज्या कार्डधारकांनी १ जुलै २०१७ पूर्वी पॅन कार्ड घेतले आहे, आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांना या लिंकिंगची गरज आहे. हे लिंकिंग आसाम, जम्मू आणि काश्मीर तसेच मेघालयातील रहिवाशांसाठी अनिवार्य नाही. याशिवाय आयकर अधिनियम १९६१ अनुसार अनिवासी भारतीयांनाही आधार-पॅन लिकिंगची गरज नाही. जे लोक गेल्या वर्षीपर्यंत वयाच्या ८० वर्षे वा त्यापेक्षा अधिक वयाचे आहेत, त्या भारतीय नागरिकांनाही लिंकिंगची गरज नाही. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, जे लोक या निकषांमध्ये आहेत, त्यांच्यासाठी आधार-पॅन लिंकिंग ऐच्छिक आहे. मात्र, त्यांना यासाठी दंडाची रक्कम भरावी लागेल. जर लिंकिंग केले नाही, तर पॅन कार्ड निष्क्रिय होवून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात अडथळे येतील. टॅक्स रिफंडही मिळणार नाही. बँक अकाउंट उघडण्यास अडचणी येवू शकतात. म्युच्युअल फंड आणि शेअरमध्ये गुंतवणुकीतही अडथळे येतील.