अयोध्या: जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांच्या अनुसार जिल्ह्यातील कोणत्याही क्षेत्र मध्ये टोळ दलाचा प्रकोप नाही. शेतकऱ्यांनी पिक वाचवण्यासाठी सर्व तयारी केली आहे. या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी जिल्हयातील 1257 गांवा मध्ये सुरक्षेसाठी कृषि विभागाचे 155 कर्मचारि तैनात आहेत. नोडल अधिकारी असणारे मुख्य विकास अधिकारी प्रथमेश कुमार कृषि, कृषि रक्षा, उद्यान, ऊस, साखर कारखाने आणि कृषि वैज्ञानिका बरोबर बैठक घेण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, नऊ मोठे पाण्याचे स्प्रेयर तसेच अग्निशमन विभागातून एक धुराची मशीन, 42 ट्रॅकटर , माउंटेड स्प्रेयर साखर कारखाना रौजागांव, 12 ट्रॅकटर माउंटेड स्प्रेयर साखर कारखाना मसौधा, पाच ऑटोमेटिक स्प्रेयर तसेच एक फॉगिग मशीन नगर निगम, दोन ऑटोमेटिक स्प्रेयर तसेच एक फागिग मशीन नगर पंचायत भदरसा आदी फवारणीसाठी घेतली जाणार आहे. पांच ऑटोमेटिक स्प्रेयर, आठ छोटे स्प्रेयर नगर पालिका रुदौली, सहा ऑटोमेटिक स्प्रेयर व दोन फागिग मशीन नगर निकाय बीकापुर, एक ट्रैक्टर माउंटेड स्प्रेयर तसेच दोन ऑटोमेटिक स्प्रेयर नगर निकाय गोसाईंगंज, 10 ट्रैक्टर माउंटेड स्प्रेयर उद्यान विभागाच्या अतिरिक्त शेतकऱ्यांजवळ पीकसुरक्षेसाठी हैंड स्प्रेयर यापूर्वीच उपलब्ध आहेत.
जिल्हा्हाधिकाऱ्यांच्या अनुसार टोळ दलापासून बचाव करण्यासाठी पाच हजार लीटर औषध फवारणीसाठी कीट रसायन दुकानात रिजर्व केले गेले आहे. कीटनाशक विक्रेत्यांजवळ 10 ते 12 हजार लीटर कीट रसायन फवारणीसाठी उपलब्ध आहे. रौजागांव साखर कारखान्यायाजवळ तीनशे लीटर व मसौधा यांच्या जवळ ही नऊशे लीटर कीटक नाशक औषध उपलब्ध आहे. प्रत्येक तहसील च्या नोडल अधिकारी उप जिल्हाधिकारी तथा विकास खंडाचे नोडल अधिकारी खंड विकास अधिकारी बनवले गेले आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.