कच्च्या तेलाच्या दरात घट झाल्यामुळे याचा परिणाम साखर उद्योगावर होण्याची शक्यता आहे. कोरोना वायरस मुळे लॉक डाउन आणि आंतरराष्ट्रीय दरांमध्ये घट झाल्यामुळे साखरेच्या निर्यातीला बाधा आली आहे, आणि आता ब्राजील इथेनॉल उत्पादना पेक्षा अधिक साखर उत्पादनाकडे वळत आहे. यामुळे, आंतरराष्ट्रीय बाजारात साखर अधिक होईल, ज्यामुळे साखरेच्या किमती वर परिणाम होईल.
जगभरातील देशात लॉकडाउन ची घोषणा झाल्यानंतर मार्चमध्ये अंतराष्ट्रीय आणि घरगुती वाहतुक थांबली आहे. यामुळे पेट्रोल आणि डीजेल च्या मागणीत मोठी घट झाली आहे. कच्च्या तेलाची कमी पाहता, ब्राजील ने आपल्या निती मध्ये परिवर्तन करुन ऊसाच्या रसापासून इथेनॉल ऐवजी साखर उत्पादनांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. साखर उत्पादनात बाजील कडून होणारी वृध्दी आंतराष्ट्रीय बाजाराला प्रभावीत करेल. जेव्हा जेव्हा तेलाच्या किंमती योग्य असतात तेव्हा ब्राजील अधिक फायद्यासाठी इथेनॉल उत्पादनावर जोर देतो.
भारतात घरगुती वापरासाठी सााखर विक्री होते, आणि मिठाई, फार्मासीटिकल्स आणि पेय पदार्थामध्येही साखरेचा मोठया प्रमाणात उपयोग केला जातो. सध्या, लॉकडाऊन मुळे सर्व उद्योगही बंद आहेत.