हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पूर्व मानसून पावसाचे प्रमाण देशामध्ये 22 टक्क्यांनी कमी झाले आहे. ऊस, भाज्या, फळे आणि कापूस यासारख्या पिकांच्या उत्पादनांवर परिणाम होऊ शकतो,
भारतीय हवामान खाते (आयएमडी) यांच्या म्हणण्यानुसार 1 मार्च ते 15 मे दरम्यान, केवळ 75.9 मिलीमीटर पाऊस पडला आहे तर सामान्य पाऊस 96.8 मिलीमीटर आहे.
बिझिनेस स्टँडर्डच्या मते, 1 मार्च ते 24 मार्चपर्यंत पाऊस 27 टक्के कमी झाला आहे. पूर्वेकडील आणि पूर्वोत्तर भारतातील पावसाच्या आकडेवारीमुळे ही घट दिसून येत आहे . तथापि, हवामान शास्त्र विभागाने असे म्हटले आहे की दक्षिण पश्चिम मान्सून दक्षिण अंदमान समुद्राकडे जात आहे आणि अनुकूल दिशा निर्देशांमुळे पुढील दोन तीन दिवसांत उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटावर पोहचू शकतो.
हवामान खात्याच्या दक्षिण भारत कार्यालयाने सध्याच्या मान्सूनमध्ये 46 टक्क्याची घट नोंदवली आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण देशावर होऊ शकतो. यानंतर 1 मार्च आणि 24 एप्रिल दरम्यान उत्तर पश्चिम उप विभागातील पाऊस 36 टक्क्यांनी कमी होऊ शकतो आणि उत्तर भारतामध्ये 38 टक्क्यांपर्यंत सामान्य राहिल .
झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि पूर्वेकडील भागात मानसून सात टक्क्यांनी कमी राहील व महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगढ, गुजरात आणि मध्य प्रदेश भागात मान्सून सामान्य असणार आहे
तथापि, 1 मार्च ते 24 मार्च दरम्यान मध्य प्रदेश मध्ये सुद्धा 5 टक्के कमी पाऊस पडला आहे . तीव्र उन्हामुळे मराठवाडा भागातील बऱ्याच धरणात पाण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे.
महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे, देशाच्या बऱ्याच भागांमध्ये फळे आणि भाज्या उत्पादनास मान्सूनला फार महत्व असते, त्याचप्रमाणे पूर्वोत्तर आणि पश्चिम घाटांच्या भागामध्ये चहा, कॉफी, रबर इत्यादी सारख्या पिकांसाठी देखील महत्त्वाचे आहे. ओडिसा सारख्या राज्यांमध्ये पेरणी ही केवळ पूर्व मानसून हंगामातच होते.
मध्य भारतमध्ये ऊस आणि कापूस ही पिके फक्त सिंचनांवर अवलंबून असतात आणि पूर्व मानसून पावसामुळे त्यांना मदत होते. हिमालयी जंगली भागात सफरचंदासारख्या रोपासाठी पूर्व मानसून पाऊस आवश्यक असतो. पूर्व मानसून पावसामुळे जंगलांमध्ये लागलेली आग विझण्यास मदत होते.