भाव घसरल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार खरेदी करू शकते टोमॅटो

नवी दिल्ली : देशाच्या काही भागात टोमॅटोच्या किमती घसरल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसू लागला आहे. सरकारने शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी देशातील काही भागात टोमॅटो खरेदी करण्याचा विचार सुरु केला आहे. यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या किंमत स्थिरीकरण निधीचा (PSF) वापर करण्याचा सरकारचा विचार आहे. या निधीचा वापर सामान्यत: भाजीपाल्याच्या किमती कमी करण्यासाठी केला जातो. सरकार या माध्यमातून अत्याधिक टोमॅटो उत्पादित झालेल्या क्षेत्रातील टोमॅटोची खरेदी करते आणि ज्या बाजारात टोमॅटोचा तुटवडा आहे, त्याठिकाणी त्याची विक्री करते.

टोमॅटोच्या किमती झपाट्याने उतरल्याने काही शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडून जनावरांना घातल्याच्या घटना घडल्या आहेत. टोमॅटोचे भाव ऑगस्टमधील प्रतिकिलो ₹250 वरून गेल्या आठवड्यात प्रतिकिलो ₹3-10 पर्यंत घसरले आहेत. टोमॅटोच्या बंपर उत्पादनानंतर, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठ्या बाजारपेठांमध्ये मोठी घसरण दिसून आली. सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे उत्पादन 956,000 टन आणि ऑक्टोबरमध्ये 1.3 दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here