कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे कामगार हे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत. तुम्ही केलेल्या कष्टामुळे माझा सहाव्यांदा विजय साकारला, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. काळम्मा बेलेवाडी (ता. कागल) येथील कारखाना कार्यस्थळावर त्यांची सवाद्य मिरवणूक व सत्कार झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले कि, साखर कारखान्याच्या प्रगतीत शेतकरी आणि कामगारांचे योगदान मोलाचे आहे. यावेळी शामराव मोरे, सुभाष गुरव, संपतराव चव्हाण, काशीनाथ घोडके यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार फेडरेशनचे खजानीस उदय भंडारी, बबन भंडारी आदी उपस्थित होते. संजय शामराव घाटगे यांनी स्वागत केले. मोहन पाटील यांनी प्रास्ताविक केले. संतोष मोरबाळे यांनी आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या:
सातारा : नवी दिल्लीत ‘जयवंत शुगर्स’चा राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरव
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.