साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचा 20 मे रोजी निरोप समारंभ

पुणे : महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (IAS) यांचा 20 मे रोजी निरोप समारंभ होत आहे. भूमाता परिवार, छत्रपती उदयनराजे भोसले महाराज फाऊंडेशन आणि शुगर टुडे मॅगझिन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम शनिवारी सकाळी ११ वाजता डॉ. श्रीराम सभागृह, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेज ऑफ अग्रीकल्चर चे कुलगुरू डॉ.बुधाजीराव मुळीक हे असतील.

गायकवाड 1987 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आणि त्यांनी राज्यभर विविध पदांवर आणि स्थानांवर केलेल्या कामातून त्यांनी स्वतःची कर्तबगार अधिकारी म्हणून ओळख मिळवली. गायकवाड हे मूळचे शिरूरमधील मलठणचे रहिवाशी आहेत. 1987 मध्ये एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात कोल्हापुरातून केली आणि नंतर सोलापूर, ठाणे आणि नाशिक येथे विविध पदावर काम केले. नाशिकमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी पद भूषवले. त्यांनी पुणे महापालिका आयुक्त म्हणूनही काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here