सरफेस सीडिंग तंत्राने शेतकऱ्याने मिळवले गव्हाचे विक्रमी उत्पादन

अमृतसर : तरनतारन जिल्ह्यातील कलस गावातील प्रगतशीलल शेतकऱ्याने गव्हाच्या सरफेस सीडिंग (पृष्ठभाग पेरणी) तंत्र वापरून प्रती एकर २६.३० क्विंटल इतके उच्चांकी उत्पादन मिळवले आहे.

शेतकरी गुरदेव सिंह यांनी सांगितले की, त्यांनी कृषी विभागाच्या एका योजनेंतर्गत प्रात्यक्षिक प्लांटमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले, ज्यामध्ये त्यांनी भाताचे अवशेष (पेंढा) न जाळता बियाणे पेरून खतांची फवारणी केली. भात कापल्यानंतर गव्हाची पेरणी केली. नंतर कटरच्या सहाय्याने भाताचे अवशेष कापून ते शेतातच पसरले.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या शेतामध्ये शेतकऱ्याला तण नियंत्रणासाठी तणनाशक वापरावे लागत नाही. कारण हे तंत्र मल्चिंग प्रमाणे काम करते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरफेस सीडिंग हे असे तंत्र आहे, ज्याद्वारे शेतकरी आपला खर्च कमी करू शकतात आणि अधिक उत्पादन मिळवू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here