मधेपुरा : जिल्ह्यात यंदा गव्हाचे शेती मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दोन हजार हेक्टर अधिक गव्हाचे पिक आहे. ४२ हजार हेक्टर शेतीत चांगले पिक येण्याचे अनुमान आहे. तर शेतांमध्ये पिक वाळत असल्याच्या बातम्यांनी शेतकरी हवालदिल झाले आहेत. सध्या शंकरपूर आणि सिंहेश्वरमध्ये गहू वाळत असल्याची माहिती समोर आली आहे. जर अशा प्रकारे पिक वाळले तर गव्हाचे दाणेही मिळणार नाहीत, त्यावर कोरडा रोग फैलावण्याची भीती आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्ह्यात मार्च महिन्यातील तापमान अधिक आहे. बुधवारी कमाल तापमान ३३ तर किमान तापमान १९ डिग्री सेल्सिअस होते. हवामान विभागाने १९ मार्चपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. अगवानपूर येथील कृषी हवामान अभ्यासक अशोक पंडित यांनी सांगितले की, जिल्ह्यात पावसाला अनुकूल स्थिती आहे. गारपीटही होऊ शकते. पंडित यांनी सांगितले की, मार्च महिन्यात कमाल तापमान ३० तर किमान तापमान १६ डिग्री असले. मात्र, गेल्या काही वर्षात यात वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक तापमान आहे. त्यामुळे गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शंकरपूर विभागातील शेतकरी बबलू मुखिया, दीपनारायण यादव, राजेन्द्र यादव व सत्यनारायण यादव, सिंहेश्वर विभागातील शेतकरी मो. नसीर आदींनी सांगितले की, आधी तप्त हवेचा सामना करावा लागत होता. आता गव्हावर सुखेडा रोगाचा फैलाव आहे.