नवी दिल्ली: शेतकर्यांच्या आंदोलनाबाबत रविवारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची उच्चस्तरीय बैठक पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी सहभाग घेतला होता. बैठकीच्या एक दिवसानंतर अमित शाह यांनी आंदोलनकर्त्या शेतकर्यांची भेट घेतली आणि सांगितले की, जर शेतकरी आंदोलनासाठी आरक्षित स्थळ बरारी येथे गेले तर 3 डिसेंबर च्या निर्धारीत ताऱखेपूर्वी चर्चा केली जावू शकते.
त्यांनी दावा केला की, मी कधीच सांगितले नव्हते की, शेतकर्यांचा विरोध राजकीय आहे. त्यांनी सांगितले की, त्यांनी शेतकर्यांना आपले आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. केंद्राची बैठक सशर्त होती आणि शेतकर्यांनी बरारी मैदानात जायला नकार दिला, असे सांगून शेतकर्यांनी शाह यांच्याशी चर्चा करण्याला नकार दिला. शेतकर्यांनी तीन कृषी विधेयकांना रद्द करण्याची मागणी केली. तसेच, त्यांनी विज अध्यादेश मागे घेणे आणि ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व शेतकर्यांना सोडण्याची मागणी केली.