साखर कारखाना परिसरात शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

सहारनपूर : साखर कारखान्यासमोर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी विविध समस्या त्वरीत सोडविल्या जाव्यात अशी मागणी कारखान्याच्या अधिकाऱ्यांकडे केली. अधिकाऱ्यांनी याबाबत लवकरच तोडगा काढू असे आश्वासन दिले.

भारतीय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष ठाकूर अजब सिंह यांनी किसान सहकारी साखर कारखाना परिसरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत बोलताना सांगितले की, साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांचे शोषण सुरू आहे. गेल्या वर्षीचे ५८ कोटी रुपयांची ऊस बिले थकीत आहेत. शेतकऱ्यांना खते देण्यात अडवणूक होत आहे. घोषणापत्रासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे. कारखान्यात भ्रष्टाचार करून ५५ ऊस खरेदी केंद्रे तीन ठेकेदारांच्या हातात सोपविण्यात आली आहेत. केन यार्डची दूरवस्था झाली आहे. या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आल्या. लवकरात लवकर त्याची सोडवणूक केली नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला. कारखान्याचे सीए के. पी. वरुण, सीसीओ धनीराम, मुख्य अभियंता संदीप कुमार, राजेश कुमार यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी तरसेम राणा, बोधराम शर्मा, ब्रह्मदत्त त्यागी, सुनील त्यागी, महेश त्यागी, जवाहर सिंह, संजय सिंह त्यागी, कुलदीप चेयरमैन, चौधरी कंवर चेयरमन, तौफिक, सुरेश त्यागी, जलसिंह, श्यामवीर प्रधान, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here