केनिया: केनियातील बुसिया शहराच्या सीमेवरून युगांडातून स्थानिक साखर कारखाने ऊसाची तस्करी करत असल्याचा आरोप ऊस शेतकऱ्यांनी केला आहे .
ऊस शेतकरी संघ या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुढे आले आहेत . तसेच केनिया असोसिएशन ऑफ शुगर केन ऍण्ड एलाइड प्रोडक्ट चे राष्ट्रीय महासचिव पीटर ओडिमा आणि बुसिया आउट गोवर्स कंपनीचे निदेशक लैंबर्ट ओगोची यांनी या विरोधात कारवाईची मागणी केली आहे.
ऊस तस्करी वर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पाहून ओडिमा यांनी असंतोष व्यक्त केला. तर ओगोची म्हणाले, युगांडातून ऊसाची आयात करतेवेळी प्रकियांचे पालन करणे आवश्यक आहे. आम्ही देशात ऊस आयातीच्या विरोधात नाही.
साखर कारखान्यांकडून ऊसाची मागणी कमी झाल्याने युगांडाच्या बुसेगा उपक्षत्रातील ऊस उत्पादक चिंतेत आहेत. ऊसाचे अधिक उत्पादन आणि त्याला न मिळणारी किंमत यामुळे केनियाला कच्च्या मालाच्या निर्यातीची योजना होती. पण युगांडा सरकारने निर्यात प्रस्तावाला विरोध केला.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.