सांगली : गेल्या तीन महिन्यांत सातत्याने साखरेच्या दरात घसरण झाली आहे. साखरेचा दर पडला असे साखर कारखानदार म्हणत आहेत. तर दुसरीकडे हे दरवर्षीचे षड्यंत्र असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. आता त्या कोंडीतून मार्ग कसा काढला जाणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. देशातील साखर उत्पादनात प्रचंड वाढ होत असल्याचे आकडेवारीतून दिसते. केंद्र सरकारने २०२१-२२ नंतर साखर निर्यातीला परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे देशांतर्गत बाजारपेठेतील विक्रीत घट झाल्याचे आकडे मांडले जात आहेत. जर साखर कमी पडेल म्हणून निर्यातबंदी केली जात असेल तर मग साखर शिल्लक कशी राहिली, असा सवाल तज्ज्ञांनी केला आहे.
केंद्र सरकार एकीकडे साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवणार, निर्यातबंदी कायम राहणार, इथेनॉलला प्रोत्साहन देणार नाही मग शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखान्यांनी किती वर्षे कर्ज उपसायचे, असा प्रश्न यानिमित्ताने उद्योग क्षेत्रात उपस्थित केला जातोय. सरकारने निवडणुकांच्या तोंडावर पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याची घोषणा केली आहे. त्यात साखरेचा समावेश आहे. त्यामुळे साखर उद्योगाची कोंडी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीची मागणी केली आहे. शिवाय, साखर उतारा १२.५० असलेल्या उसाला ३७०० रुपये दराची मागणी केली आहे. साखरेची किमान आधारभूत किंमत ३१०० रुपये आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.