सातारा : वाई तालुक्यात उसाची तोड सुरू असली तरी टोळ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. काही ठिकाणी उसाला १८ महिन्यांहून अधिक कालावधी लोटल्यामुळे उसाला तुरे फुटू लागले आहे. उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांनी वेळेतच ऊस घेऊन जावा अन्यथा तालुक्यातील शेतकरी संघर्ष करण्याच्या तयारीत आहे.
वाई तालुका इतर तालुक्यांच्या तुलनेत सधन मानला जातो. याच तालुक्यात किसनवीर सहकारी साखर कारखाना असल्याने शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात करत असतात. यंदा ऊसाच्या पिकाला कालावधीपूर्वी तुरे फुटल्याने उत्पन्नात मोठा फटका बसणार आहे. तालुक्यात उसाची तोड वेळेवर होत नसल्याने उसाला तुरे फुटू लागले आहेत. वजन कमी होऊन उत्पादनात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तुरे आल्याने जनावरांचा चारा सुद्धा धोक्यात आला आहे. यासाठी कारखान्यांनी वेळेत उसाची तोड करावी, अशी मागणी होत आहे.